पंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना!
पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले.यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील आरोपीने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये मोठा तनाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.