
सोमेश्वर प्रीमियम लीग 2025क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्साहात
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील जय हनुमान क्रिकेट मंडळ, सोमेश्वर आयोजित आणि श्री बाळाशेठ मयेकर आणि श्री.साहिल शेठ मयेकर पुरस्कृत सोमेश्वर प्रीमियम लीग 2025क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्साहात आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात पार पाडली.. या वर्षीSPL 2025चा विजेता संघाचा मानकरी ठरला जय भैरी मुरुगवाडा संघ आणि उपविजेता संघ आरूष स्पोर्ट्स मानकरी ठरले.विजेता संघास श्री.. संजय उर्फ बाळा शेठ मयेकर यांजकडून रोख रक्कम रुपये 51111/- आणि उपविजेता संघास श्री.रोशन भाई फाळके यांजकडून तसेच विजेता चषक सोमेश्वर गावातील युवा उद्योजक श्रद्धा एंटर प्रायझेसचे मालक श्री.दशरथ शेलार आणि उपविजेता संघास सरकारी ठेकेदार श्री.अक्षय पिलणकर यांनी पुरस्कृत केले.
या नामांकित स्पर्धेला राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत उपस्थिती दर्शवल्यामुळे जय हनुमान क्रिकेट मंडळांच्या सदस्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मा.उप नगराध्यक्ष रोशनभाई फाळके, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. दादा दली , भाजपा उपजिल्हाअध्यक्ष श्री. बावाशेठ नाचनकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, बाबा भिंगार्डे, ओंकार मोरे, जिल्हा बँक संचालक मुन्ना खामकर, सरपंच विठ्ठल सावंत, गुरुनाथ गराटे, सदानंद पवार, योगेश सावंत, मंडळाचे पदाधिकारी, तसेच शिवसेना महिला उपजिल्हाध्यक्ष सौ.विनयाताई गावडे,तालुकाध्यक्ष सौ.कांचनताई नागवेकर सोमेश्वर सरपंच सौ.दिपष्री पाटील आणि इतर प्रतिष्ठित नागरिक, महिला ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते