
सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी रत्नागिरी, पालघरमध्ये आणखी ड्रोन कार्यरत करणार.
सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी तसेच अनधिकृत मासेमारीवर निर्बंध घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात अनधिकृत मासेमारीचा वावर पाहता मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तेथे आणखी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.९ जानेवारीला या ड्रोन प्रणालीचा शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला होता. राज्यातील एकूण सात जिल्ह्यात ९ ठिकाणी या ड्रोनद्वारे किनारपट्टीवर लक्ष ठेवले जात होते.
२१ तारखेला मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाला भेट देवून ड्रोन प्रणाली यंत्रणेचा आढावा घेतला होता. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अनधिकृत मासेमारी करणार्या बोटींचा वार मोठा असल्याचे निदर्शनास आले.www.konkantoday.com