समाज कल्याण कार्यालयात हिरकणी कक्ष सुरु अन्य विभागांसाठी प्रेरणादायी- सहायक प्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते

रत्नागिरी, दि. 27 : मातृत्त्व महिलांना मिळालेले वरदान आहे. आईचे दूध हे बालकांसाठी अमृत असते. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरु करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे. समाज कल्याण कार्यालयाने शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करुन इतर विभागांना प्रेरणा देणारे काम केले आहे, असे गौरवोद्गार डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय शरीररचनाशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते यांनी काढले.

महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात येणाऱ्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष डॉ. सातपुते यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण यंत्र नव्याने स्थापित करण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे हे होते. यावेळी हिरकणी कक्षामुळे महिलांची विशेषत: स्तनदा मातांसाठी चांगली सुविधा झाल्याचे सांगून डॉ. सातपुते यांनी बाळासाठी असणारे स्तनपानाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. कक्ष सुरु केल्याबद्दल विभागाचे त्यांच्या पथकाचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच वस्तीगृहातील विद्यार्थिनिंसाठी आरोग्य आणि घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. सातपुते यांनी पाणी म्हणजे जीवन यावर विशेष मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त श्री घाटे यांनी स्वागत प्रास्तविक केले.या कार्यक्रमाला वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया दाईंगडे, समाज कल्याण निरीक्षक अमोल पाटील, सहायक लेखाधिकारी दिपाली केळकर, समतादूत माहेश्वरी विचारे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन संकुलामधील सर्व कार्यालये, महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button