रत्नागिरी जिल्ह्यात “प्रेरणा”च्या स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर प्रशिक्षणाला सुरुवात

रत्नागिरी : बाल संरक्षणावर गेली ३५ वर्षे महाराष्ट्रभर काम करणाऱ्या प्रेरणा एटीसी, मुंबई या संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर (एसएससीडब्ल्यू) प्रशिक्षण कार्यक्रमाचे किक स्टार्ट ट्रेनिंग २२ ते २५ जानेवारी या कालावधीत पार पडले. या प्रशिक्षणाचा कालावधी १० महिन्यांचा असेल. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांतील लोकांचा सहभाग असून, निवडक एकूण ३५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. दहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीतील पहिला टप्पा म्हणजे किक स्टार्ट ट्रेनिंग.

या प्रशिक्षणात बाल न्याय अधिनियम २०१५ पोक्सो कायदा २०१२, पॉक्सो कायदा नियम २०२०, बाल हक्क, केसवर्क, सामाजिक तपासणी अहवाल यांसारख्या विषयांवर सत्र घेण्यात आली. पहिल्या टप्प्यातील या प्रशिक्षणाला सदिच्छा देण्यासाठी स्नेह समृध्दी मंडळाच्या अध्यक्षा श्रद्धा देशपांडे उपस्थित होत्या. तसेच या दरम्यान चाईल्ड लाईनमधून प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे यांनी चाइल्ड लाईनबाबत प्रशिक्षणार्थींना माहिती दिली.

या प्रशिक्षणातील विविध सत्रे प्रेरणा एटीसी संस्थेच्या सहाय्यक संचालक कशिना करीम, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक गीताराणी लोरेम्बम, कार्यक्रम व्यवस्थापक दीप्ती सावंत- शेट्टी, वरिष्ठ जिल्हा समन्वयक स्वप्नील सुरासे व रत्नागिरी जिल्हा समन्वयक अश्विनी कांबळे यांनी घेतली.यानंतर पुढील आठ महिने बाल संरक्षण संबंधित शासकीय विभागांना भेटी, मनोधैर्य योजना, बाल संगोपन योजना, बालगृह- कार्य व रचना, पॉश कायदा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ऑनलाईन वेबीनार तसेच बाल विवाह, व्यसनाधीनता यांसारख्या विषयांवर कार्यशाळा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. या दहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीनंतर हे स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर रत्नागिरी जिल्ह्यात बाल संरक्षणावर काम करण्यास सज्ज असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button