मुंबई महानगरपालिका च्या संथ कामाचा फटका ,मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी दोन दिवसाने वाढला.
मुंबई महापालिकेने कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्याप वेळेत पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे मुंबईकरांना आणखी दोन दिवस सोमवार आणि मंगळवारी मेगा ब्लॉकचा त्रास सोसावा लागणार आहे. मध्य रेल्वेनं कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याकरता शनिवारी आणि रविवारी रात्री पॉवर ब्लॉक घेणार असल्याचं जाहीर केलं होतंमात्र, या पुलाचे काम अद्याप न झाल्यानं आता ब्लॉक कालावधी आणखी दोन दिवसांसाठी वाढला असून, मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातच ब्लॉकनं सुरू झाली आहे.
मस्जिद बंदर येथील 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. पुलाचा गर्डर बसवण्याकरिता ब्लॉक घेण्याची विनंती पालिकेनं रेल्वेला केली होती. या पुलाच्या कामासाठी रेल्वेनं 25, 26, 27 जानेवारी ते 1, 2, 3 फेब्रुवारी दरम्यान कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा व हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक जाहीर केला.