
प्रजासत्ताकदिनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या उपोषणाकडे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ अधिकारी न फिरकल्याने आंदोलकांच्यात संताप.
मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा म्हणून प्रजासत्ताकदिनी संगमेश्वर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणाला संगमेश्वर तालुक्यातील जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभला.राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, वाहतूक संघटना यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि मागण्यांवर ठाम असल्याचा निर्धार या आंदोलनाला व्यापक रूप देत होता.असे असले तरी कोकण रेल्वेचे अधिकारी डोळ्यांवर झापडं घालून सकाळपासून या घटनेकडे कानाडोळा करत होते. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी संगमेश्वर स्थानकातील स्टेशन मास्तरांना निवेदन देण्यात आले.परंतू त्यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.
संगमेश्वर स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनाची समज असुनही कोकण रेल्वेचे अधिकारी बिनघोरपणे वातानुकूलित केबीनमध्ये बसले होते.नेमके कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काय अपेक्षित आहे? सावंतवाडीच्या रेल्वे प्रवाशांनी जसे रेल रोको केले तशीच कृती संगमेश्वरच्या जनतेकडून कोकण रेल्वेला अपेक्षित आहे? की कॉग्रेसच्या अशोकराव जाधव यांनी व्यक्त केलेल्या मनोगता अनुसार राजधानी एक्सप्रेस अडवून कोकण रेल्वे, रेल्वे बोर्डाची मस्ती उतरवली पाहिजे?सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे साधे ढुंकूनही पाहू न शकणारे स्टेशन मास्तर संध्याकाळी मात्र सक्रिय झाले. *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्या शेठ बने* यांनी रत्नागिरी येथील रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढताच सुत्रे हलली.
यांनी रेल्वेच्या सुरक्षा रक्षक आणि स्टेशन मास्तर यांना नेमका तुम्हाला कोणता संघर्ष अभिप्रेत आहे? *असा संतप्त सवाल केला.आज सुरू असलेले आंदोलन हे संविधानिक मार्गाने चालले होते.कोकण रेल्वेने गेंड्याच्या कातडीचा अवलंब केला तर या आंदोलनाचे स्वरूप बदलू! आणि नजिकच्या काळात राजधानी एक्सप्रेस अडवून पार दिल्ली दरबाराची दारं खिडक्या खडखडवू!आता पुरे झाले अन्याय, कोकणातील जनतेने कोंबड्या बकऱ्यांसारखा रेल्वे प्रवास करायचा? की मिळेल तिथेच चक्क शौचालयातून प्रवास करायचा?रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा निवेदन स्वीकारले, याआधी पाठवलेल्या सकारात्मक प्रस्तावाची प्रस्तावाची पुनरावृत्ती न करता लवकरच मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावे या आशयाचे ते निवेदन होते.

रत्नागिरी येथे जाऊन प्रत्यक्ष खात्री करून पुढची रणनीती आखली जाईल असे सर्वानुमते ठरले.आज झालेला अपमान ध्यानात ठेऊन यापुढे रेल्वेच्या आंदोलना वेळी या अधिकाऱ्यांना तसाच सन्मान दिला जाईल अशी बोलकी लोकभावना दिसत होती.या मागण्यांचा विचार लवकरच केला नाही तर रेल रोको करणार असा सुचक इशारा *उपोषण स्थळी येऊन पाठिंबा देणाऱ्या व प्रत्यक्ष चर्चेत सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधी यांनी दिला आहे