
अजित यशवंतराव यांना उमेदवारी नाहीच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित यशवंतराव यांनी राजापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी दावा केला होता.गेले अनेक वर्ष ते प्रयत्नात होते.राजापूर विधानसभा मतदार संघाची जागा ही आघाडीमध्ये काँग्रेस ला आली आहे.यशवंतराव यांनी काँग्रेसमध्ये सुद्धा उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना यशवंतराव हेच उमेदवार पाहिजे होते परंतु काँग्रेसने राजापूर विधानसभा मतदार संघासाठी नवी मुंबईचे माजी उपमहापौर नगरसेवक अविनाश लाड यांचे नाव जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिला.त्यामुळे यशवंतराव यांचा पत्ता कट झाला.उमेदवारी नाकारल्यानंतर यशवंतराव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान केले ते म्हणाले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या उमेदवारीसाठी अथक प्रयत्न केले त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो.आपण कार्यकर्त्यांनी हरून न जाता किंवा नाराज न होता पुन्हा जोमाने राजापूर मतदारसंघात काम करण्यास सुरुवात करूया असे ते म्हणाले.
www.konkantoday.com