
अखेर मत्स्य विभाग व बंदर खात्याकडून मिरकर वाड्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई बुल्डोजरच्या साह्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात.
रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा परिसरातील बंदर खात्याच्या जागेवर अनधिकृतपणे उभे करण्यात आलेल्या मोठ्या शेड व अनधिकृत बांधकाम पाडण्यास आज पहाटेपासूनच बंदर विभाग व मत्स्य खात्याने सुरुवात केली आहे ही अनधिकृत बांधकामे उभी करणाऱ्या मत्स्यव्यवसायिकांना बांधकामे हलवण्याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या मात्र त्यानंतरही त्यांनीही बांधकामे न हलवल्याने आज पहाटेपासून या भागात अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याशिवाय बंदर व इतर खात्याचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत ही अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी चार बुलडोजर पाच डंपर व अन्य कर्मचारी वर्ग कामाला लागला आहे येत्या दोन दिवसात ही सर्व अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात येणार आहेत त्याला आता सुरुवात झाली आहे या मार्गावर येण्याच्या सर्व भागावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांकडून कोणताही विरोध झाला नसल्याचे कळते मत्स्य खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना तात्काळ बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते.
