
बोरज घोसाळकरवाडी येथे बिबट्या घुसला गोठ्यात
खेड : तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गुरांच्या गोठ्यात घुसून बावीस दिवसांच्या वासराची शिकार केली आहे. या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बबन घोसाळकर हे खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथे राहतात. रविवारी दि. 28 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घोसाळकर त्यांच्या घराजवळील गुरांच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी गोठ्यातील नवजात 22 दिवसांचे वासरू घोसाळकर यांना मृतावस्थेत आढळले. बिबट्याने हल्ला करून बिबट्याची शिकार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बोरज व पंचक्रोशीत बिबट्याचा वावर असून गेल्या वर्ष भरात बिबट्याचे दर्शन या भागात अनेकांना झाले आहे. या घटनेची वन विभागाने दखल घेऊन शेतकर्यांच्या पाळीव प्रण्यांचे संरक्षण करावे अशी मागणी होत आहे.