मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली, ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा पायी प्रवास!
मस्जिद बंदर येथे कर्नाक पूलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक बाधित झाली आहे. हा गर्डर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकविण्याचे काम सुरू आहे. रात्रीपासून गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली नाही. आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे अनेक शासकीय आणि शाळा, महाविद्यालयातील कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. मात्र अनेकांना आता वेळेत पोहोचता येणार नाही. दादर स्थानकाच्या अलीकडे एकामागोमाग लोकल थांबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी ट्रॅकवर उतरून पायी चालत जात आहेत