मिरकर वाड्यातील अनधिकृत बांधकामावर उद्या मत्स्य विभाग कारवाई करण्याच्या जोरदार तयारीत.
रत्नागिरी शहरा जवळील मिरकर वाडा बंदरात असलेले अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मत्स्य विभागाने जवळ जवळ 300 च्या वर मत्स्यव्यवसायिकांना नोटीसा दिल्या होत्या त्यानंतर मत्स्य व्यावसायिकानी यासाठी मुदत मागितली होती त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली होती या कालावधी काहीजणानी आपली बांधकामे हटवली मात्र अनेक व्यावसायिक आणि ही बांधकामे तशीच ठेवली आहेत त्यामुळे मत्स्य विभाग उद्या सकाळपासून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी सज्ज झाला असून तशी यंत्रणा त्यांनी सज्ज ठेवली आहे