
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, 3 जणांना पद्मभूषण, तर 11 जणांना पद्मश्री जाहीर.
महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्रीपुरस्कार मिळाला आहे. जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारनं पद्म पुसरस्करांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातअनोखे काम करणाऱ्यांच्या पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2025 महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते
पद्मभूषण1. मनोहर जोशी (मरणोत्तर) 2. पंकज उधास (मरणोत्तर)3. शेखर कपूरपद्मश्री1. अच्युत पालव – कला2. अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग3. अशोक सराफ – कला4. अश्विनी भिडे देशपांडे – कला5. चैतराम पवार – सामाजिक कार्य6. जसपिंदर नरुला – कला7. मारुती चितमपल्ली – साहित्य8. रानेंद्र भानू मुजुमदार – कला9. सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी10. वासुदेव कामत – कला11. विलास डांगरे – वैद्यकीयमारुती चित्तमपल्ली यांचे कार्यमारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली आहे.
त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती. 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती. त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हासकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
मी मराठी नवीन एक लाख शब्द दिले, पुरस्कार मिळाल्याचा आनंद आज मला प्रचंड आनंद झाला असल्याचे मत पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली यांनी व्यक्त केले. मी मराठी नवीन एक लाख शब्द दिले आहेत. सध्या त्याच शब्दकोशावर मी काम करत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले. अपेक्षा होतीच पुरस्काराची मात्र आज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद होत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले.