
बांगलादेशी महिलेला चिपळुणातून दिला जन्म दाखला, चौकशी प्रकार उघड.
रत्नागिरी येथे सापडलेल्या बांगलादेशी महिलेने सादर केलेल्या जन्म दाखला चिपळूण पंचायत समितीच्या नावाने देण्यात आला होता. चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मात्र मुळात हा दाखलाच संशयास्पद व बनावट असण्याची शक्यता आहे.या जन्म दाखल्याची रजिस्टरवरील नोंद देखील संशयास्पद आहे. या दाखल्याची पडताळणी करून त्याचा अहवाल चिपळूण पंचायत समितीकडूनरत्नागिरी शहर पोलिसांना लवकरच पाठविण्यात येणार आहे.
रत्नागिरी पोलिसांनी चिपळूण पंचायत समितीकडे सनमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सनमा राहिल बोंबल यांच्या जन्म दाखल्याची पडताळणी करण्यास कळवले आहे. तसेच जन्म दाखल्याच्या रजीस्टरवरील नोदींची प्रत मागितली आहे. सनमा बिलाल मुल्ला यांचा जन्म सावर्डे येथे १९९४ मध्ये झाल्याची नोंद घालण्यात आली आहे. त्यांचा कायमचा पत्ता हा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील दाखवला आहे.
हा जन्म दाखला १८ मार्च २०२१ रोजी चिपळूण पंचायत समितीमधून देण्यात आला. अबिदा बिलाल मुल्ला यांनी ही जन्म नोंद केली आहे.चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडून दाखल्याची पडताळणी सुरू आहे. या जन्म दाखल्याच्या रजीस्टरची पडताळणी केल्यानंतर विविध संशयास्पद बाबी समोर येत आहेत