धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून बंदुकांची निर्मिती रत्नागिरीमध्ये -पालकमंत्री उदय सामंत.

रत्नागिरी : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात प्रथमच गोळप सौर प्रकल्पाने केले आहे. दुसरा प्रकल्प गुहागरमध्ये मूर्त स्वरुप घेत आहे. कशेळी हे संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरु राहणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचारी, पत्रकार मित्र आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आपल्या देशाची गतिमान पाऊले पडत आहेत. सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा, विकासाचा केंद्रबिंदू आहे. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा दबदबा जगात वाढत चालला आहे.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना चालू आर्थिक वर्षाचा रू. 360 कोटी इतका मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय असून, जिल्ह्याच्या विकासावर तो 100 टक्के खर्च होईल. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली दावोस येथे 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यापैकी 40 हजार कोटींचे सामंजस्य करार रत्नागिरी शहरासाठी आहेत. त्यामुळे 25 ते 30 हजार युवक-युवतींना आता रोजगार उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प जिल्ह्यात व्हावेत, अशी सर्वांची इच्छा होती. कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळे विकसित होत आहेत. तालुकाच्या ठिकाणी शिवसृष्टी ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथम जिल्ह्यात उदयास आली. दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर याठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात यशस्वी झालो. उर्वरित तालुक्यातही शिवसृष्टी उभारण्याचे काम दोन वर्षात केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांने पावन झालेल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र तयार होत आहे. याचा उपयोग देशातील आणि परदेशातील शिवप्रेमींना होणार आहे. देशातला पहिला थ्रिडी मल्टीमीडिया शो महिनाभरात लोकार्पण करत आहोत.

200 कोटी रुपये खर्चून रत्नागिरीत झालेल्या टाटा कौशल्यवर्धन केंद्रातून 5 हजार विद्यार्थी पुढे येणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. रत्नागिरी शहरातील नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषदेची इमारत असेल, पोलीस अधीक्षकांचे कार्यालय असेल या सर्व इमारती 800 कोटी रुपये खर्चून सुसज्ज होत आहेत. 24 कोटी रुपये मधून निर्माण होणाऱ्या क्रीटीकल केअर युनिटचे भूमिपूजन आज होणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाची इंग्रजकालीन वास्तू डागडुजी करण्यासाठी 14 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे काम सुरु आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय हे कुठेही जाणार नाही, जिल्ह्यातच राहणार आहे, अशी खात्रीही पालकमंत्र्यांनी दिली.

भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा आपल्या रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय, त्यासाठी दावोस 16 हजार 500 कोटींचा सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरबरोबर झाला आहे. हा आपणा सर्वांचा अभिमान व स्वाभिमान आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, थिबा राजाने ज्या ठिकाणी भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, त्याठिकाणी साडेआठ कोटी खर्चून बौध्द विहाराची वास्तूचे काम सुरु करण्यात आले आहे. देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत होत आहे, त्याची सुरुवात वर्षभरात करायची आहे. पुस्तकांचे गाव मालगुंडला केले जाईल, त्यासाठी सव्वा कोटी रुपये मराठी विभागाकडून दिले जातील. भविष्यातही देशाची, झेंडाची शान अशीच कायम ठेवावी, त्यासाठी देशभक्तीपर कार्यक्रम प्रशासनाकडून राबविले जावेत, असेही पालकमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. यानंतर पोलीस पथक, महिला पोलीस पथक, गृह रक्षक दल, पोलीस बँड पथक, गृह रक्षक महिला पथक, एनसीसी स्काऊट गाईड, एनसीसी नेवल, नवोदय विद्यालय स्टुडन्ट पोलीस कॅडेट, विराट श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक, अग्नीशामन दल, उमेद टुरिस्ट व्हॅन, प्राथमिक शिक्षक विभाग आदींनी संचलन करुन मानवंदना दिली. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, ए डी नाईक गर्ल्स हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, शिर्के हायस्कूल, मेस्री्ट हायस्कूल, कॉन्वेन्ट स्कूल आदींचा सहभाग होता.

समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने घर घर संविधान अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सुलभा श्रीपाद धाकरस, तृतीयपंथी पल्लवी प्रकाश परब आणि दिव्यांग प्रशांत महेंद्र सावंत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते.*पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध सत्कार*ध्वजदिन निधी संकलनामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. फोर्सवन पथकामध्ये विशेष सेवा पथक सोहेल इक्बाल ढगे, उत्कृष्ट उद्योजक शर फरद्दीन अब्दुला साखरकर, शिराजउद्दीन अब्दुला साखरकर प्रथम पुरस्कार, दत्तात्रय जाधव द्वीतीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशांत महेंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला. अग्रीस्टॅक योजनेमध्ये शेतकरी ओळख क्रमांक सन्मानपत्र उमेश लाड, दत्तात्रय सोहोनी आणि संतोष सकपाळ यांना देण्यात आले. *सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांनी स्टेडियम जिंकले* सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल सिटी रत्नागिरीने वंदन भारतमातेला व संविधानाला, एम. एस. नाईक हायस्कूलने भारत का नया चेहरा आणि पटवर्धन हायस्कूलने देशभक्तीपर नृत्य सादर करुन उपस्थितांना भारावून टाकले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमाने स्टेडियम जिंकले.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button