
कोत्रेवाडीवासियांचा फेर तपासणीला आक्षेप
जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार राजापूर तहसीलदार यांनी लांजा कोत्रेवाडी येथील इंम्पिंग ग्राउंड प्रकल्प जागेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अपेक्षित असताना केवळ लांबूनच पाहणी केली आहे. त्यामुळे फेर तपासणी करण्याचा शासनाकडून केवळ दिखावा केला जात आहे का असा सवाल कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.कोत्रेवाडी वस्तीलगत लांजा नगरपंचायतीमार्फत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नाही. उलट जलखीत जवळ आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पाची जागा ही शासनाच्या २०१६ च्या निकषात बसत नसल्याचे पत्र दिलेले आहे. तरीही लांजा नगरपंचायतीकडून हा प्रकृत्य रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठकीनंतर प्रकल्याच्या जागेची फेरतपासणी करण्याचे पत्र राजापूर तहसीलदारांना दिले होते.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदार यांची भेट घेतली यावेळी ग्रामस्थांनी विविध बाबी तहसीलदार गंबरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सदर जागेची दुरून पाहणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ङ्गङ्गग्रामस्थांच्या आग्रही मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तहसीलदार यांनी पुन्हा एकदा फेरतपासणी करावी यासाठी याचिका कर्त्या सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊनच या जागेची प्रतक्ष फेरतपासणी करावी, अशी अशी मागणी करण्यात आली.www.konkantoday.com