
कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर.
कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.संजय दराडे यांनी कोकण विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलिस स्थानकाला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत सूचना केल्या हाेत्या.
विशेषतः महिलांवरील अत्याचार महिलांबाबत असलेल्या तक्रारी याबाबत २४ तासाच्या आत संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अनेक काही हत्या प्रकरण घडली आहेत. या प्रकरणांचा छडा लावण्यात संजय दराडे यांनी मोठी भूमिका बजावली आहे.