
कर्ज हप्त्यांची विचारणा केल्याप्रकरणी महिलांकडून तरुणाला मारहाण.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप पर्शुरामनगर येथे कर्ज हप्त्यांची विचारणा केल्याप्रकरणी महिलांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी सायं. ४ च्या सुमारास घडली. चंदन चंद्रकांत पावसकर (३१, रा. पावस) असे मारहाण करण्यात आलेल्याचे नाव आहे.चंदन पावसकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुर्णगड पोलिसांनी तिघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपी महिला यांनी बचत गटाचे कर्ज घेतले होते. वेळेत हप्ते न भरल्याने चंदन पावसकर हे गोळप पर्शुरामनगर येथे आरोपी महिला यांच्या घरी गेले. तसेच कर्ज फेडीबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपी महिलांनी चंदन यांना शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली.