एसटी नफ्यात आली मग 15 टक्के भाडेवाढ का? प्रकाश आंबेडकर यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल.
महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सूट दिल्याने दिवसाला 150 कोटींच्या तोट्यात असलेली एसटी महिन्याला 40 कोटी नफ्यात आली होती असे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.मग देवेंद्र फडणवीस यांनी 15 टक्के भाडेवाढ का केली असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहेएसटी भाडेवाढीवर टीका करताना आंबेडकर म्हणालेएकनाथ शिंदे मला सर्जरीनंतर बघायला आले होते. त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं की एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सूट दिली आहे त्यामुळे एसटी किती तोट्यात गेली आहे? त्यांनी उत्तर दिलं की या बरेचसे उलटं झाल आहे.
50 टक्के सूट दिल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवसाला एसटी 150 कोटींच्या लॉसमध्ये असलेली महिन्याला 40 कोटी प्रॉफिटमध्ये आली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एसटीच्या भाडे दरात 15 टक्क्यांनी वाढ केली. नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायचा ? असा सवाल त्यांनी केला.आकडेवारीनुसार बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती खरी होती.
एसटी म्हणजे सर्वसामान्य लोकांचं साधन आहे. यात मुख्यमंत्र्यांनी 15 टक्क्यांनी दरवाढ केली त्याचा खुलासा करावा. आता फॅशन झाली जो मुख्यमंत्री होतो तो मनाने निर्णय घेतो. भाडेवाढ का केली हे मुख्यमंत्री सांगायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे.भाडेवाढ मुळे सर्वसामान्य लोकांना भुर्दंड मात्र बसतो आहे, असा आरोप त्यांनी केला.