स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेवयोजनेला ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
योजनेचे शेवटचे ५ दिवस शिल्लक : विशेष व्याजदराच्या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.
स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेवयोजनेला ठेवीदारांचा उस्फुर्त प्रतिसाद प्राप्त होत असून आजपर्यंत रु.७ कोटी ८८ लाखांच्या ठेवी नव्याने जमा झाल्या आहेत.
आज रत्नागिरीमध्ये अनेक बँका, वित्तीय संस्था उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या संख्येने ठेवीदार स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेशी संलग्न आहेत. ठेवीदारांचा हा विश्वास जपणे हेच संस्थाचालक म्हणून आमचे कर्तव्य आहे. संस्थेचे नाव आज जनमानसाचे मनावर ठसले आहे. आपली संस्था या भावनेतून ठेव घेवून येणारा ठेवीदार हा संस्थेच्या कामकाजासाठी प्रेरणादायी आहे. ठेवीदारांचा भरभरून लाभलेला प्रतिसाद जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र करून जातो. आर्थिक क्षेत्रात संस्थेचे असलेले विश्वासार्ह स्थान, स्वतंत्र कार्यपध्दती, आर्थिक शिस्त व उत्तम ग्राहकसेवा देण्याचा शिरस्ता संस्था सातत्याने जपेल असे संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले. सर्व शाखांमध्ये ठेवींचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. रत्नागिरी शाखा व मारुतीमंदिर शाखा या शाखांनी या आधीच १ कोटीपेक्षा जास्त ठेवी जमा केल्या आहेत.
नववर्ष स्वागत ठेव योजनेचे शेवटचे ५ दिवस शिल्लक आहेत. या नववर्षाच्या स्वागत ठेव योजनेत १६ ते १८ महिने मुदतीच्या स्वरुपांजली ठेव योजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ८.५०% ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ८.७५% तर १९ ते ३६ महिने मुदतीच्या सोहम ठेव याजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ८.६०% व ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ८.८०% एवढा व्याजदर घोषित केला आहे. तसेच एकरकमी रु.६ लाख व अधिक रकमेसाठी ९.००% एवढा व्याजदर देऊ केला आहे. ३१ जानेवारी २०२५ रोजी हि योजना संपेल तरी या विशेष व्याजदराचा लाभ ठेवीदारांनी घेवून जास्तीत जास्त गुंतवणूक या योजनेत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.