रत्नागिरी: दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर जोरदार स्वागत.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे मुलींचा संघ डॉज बॉल स्पर्धेत राज्यस्तरावर खेळून आलेल्या आणि त्यातील 4 विद्यार्थिनीचे राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर जोरदार स्वागत कारण्यात आलं. या स्वागतासाठी मुस्लिम एजयुकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष तौफिक चिकटे, सचिव रुमान पारेख, सदस्य अजिज वागले तसेच मुख्याध्यापक श्री कोळेकर सर, श्री राजेश जाधव सर, सागर पवार आदी उपस्थित होते. संघाने केलेल्या कामागिरीसाठी सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या.