
पटवर्धन हायस्कूल चे पाचवी स्कॉलरशिप मध्ये घवघवीत यशपाचवीचे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
उज्वल यशाची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल या प्रशालेला इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तम आणि घवघवीत यश मिळाले आहेयावर्षी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पाचवीचेतब्बल 16 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेतदरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये पटवर्धन हायस्कूल अग्रेसर असतेयावर्षीही शिष्यवृत्तीच्या उत्तम निकालाची परंपरा प्रसारणे कायम ठेवली आहे,भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी श्रीराम भावे, सुनील उर्फ दादा वणजू,नचिकेत जोशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केलेप्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकरपर्यवेक्षक अमर लवंदे, कल्पना शिरोळकर यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेया परीक्षेमध्ये आभा घारपुरे, आराध्य फणसे, अर्णव मरगाळे, दुर्वा चव्हाण, गिरीश जाधव, हर्ष सकपाळ ,इंद्रनील आठले, ईशान नेवरेकर, सानवी झगडे, श्लोक धुमाळे,त्रिशा नेवरेकर ,उन्नती बंदरकर, स्वराली टापरे, वल्लरी मुकादम, वरद भोये आणि विणा बंडबे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहेया शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभाग प्रमुख म्हणून शिक्षिका श्रद्धा बोडेकर यांनी तासिका व सराव परीक्षांचे नियोजन केले होतेपरीक्षेसाठी मराठी विषयाकरिता गायत्री गवळी, मीना ताडे, श्रद्धा हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले तर गणित विषयासाठी रमेश कनोजे, मीनल बागवे,इंग्रजीसाठी माणिक भोये, पुनम काटकर,तर बुद्धिमत्तेसाठी श्रद्धा बोडेकर आणि हेमलता गुरव या सर्व शिक्षकांनी उत्तम मार्गदर्शन केलेअभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन पटवर्धन हायस्कूलमध्ये नेहमीच केले जातेसंस्था पदाधिकारी आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारे सराव करून घेतला जातो त्यामुळे प्रतिवर्षी पटवर्धन हायस्कूल ला शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश मिळत आहेयावर्षीही तब्बल सोळा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्याने प्रशालेच्या यशामध्ये आणखीन एक अध्याय जोडला गेला आहे.