भाडेवाढ शिवाय पर्याय नाही,लाडक्या बहिणींना जी 50% सूट दिलेली आहे ती तशीच कायम राहील-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.
जुन्या ज्या योजना आहेत त्यांच्यात कुठेही कटोती होणार नाही, लाडक्या बहिणींना जी 50% सूट दिलेली आहे ती तशीच कायम राहील, 50 टक्के सूट दिल्यानंतर एसटीच्या उत्पादनात वाढ झालेली आहे कारण प्रवासी संख्या वाढलेली आहे.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसंच, ज्येष्ठ नागरिकांना जी आम्ही सूट देतोय 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हे आम्हाला राज्य सरकारकडून अनुदान मध्ये प्राप्त होत असते, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. भाडेवाढ शिवाय पर्याय नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ काल मंजूर केली आहे. 1 फेब्रुवारीपासून टॅक्सी आणि रिक्षाचे पण भाडेवाढ होणार आहे. अद्याप माझ्यापर्यंत अधिकृत फाईल त्या संदर्भातली आलेली नाही. एसटीची भाडेवाढदर वर्षाला करणं गरजेचं आहे. दर दिवशी 3 कोटींचा तर महिन्याला 90 कोटी तोटा सहन करावा लागतो, अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.