चिपळूण तालुक्यातील बेकायदा गुरे वाहतुकीचे खेर्डीच मुख्य केंद्र.
कितीही वाहतूक पकडली, गंभीर घटना घडल्या तरीही बेकायदा गुरे वाहतूक अद्यापही थांबली नसल्याचे दोन दिवसांपूर्वीच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हेतर खेर्डी हेच अशा वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या चर्चेवरही शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या आकले, मार्गताम्हाने, पोफळी ही खरेदी व वाहतुकीची मोठी ठिकाणे असल्याची चर्चाही सध्या सुरू असून रात्री व पहाटे ट्रक, बोलेरो गाड्यांमधून ही वाहतूक होते.
गुरूवारी बेकायदा गुरे वाहतुकीप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.चिपळूण हे गुरे वाहतुकीचे मुख्य ठिकाण आहे. काही वर्षे मागे जाता येथे अनेक दलाल हा व्यवसाय करीत होते. त्यामुळे अनेकांवर गंभीर गुन्हेही दाखल आहेत. यात खेर्डीतील अनेकांचा समावेश आहे. खेर्डी हे गुरे वाहतुकीचे कायमच मुख्य केंद्र राहिले आहे. मध्यंतरी तालुक्यातून होणारी गुरे वाहतूक काही प्रमाणात थांबली होती. मात्र आता तिने पुन्हा जोर धरला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह गेड तालुक्यातील पोसरे परिसरात जावून अल्पदरात गुरांची खरेदी करून रात्रीत त्यांची वाहतूक करण्याचा प्रताप हे दलाल करीत आहेत.
अनेकदा खेर्डी, मार्गताम्हाणे, आकले, पोफळी या गावांमध्ये काही स्थानिकांचा आधार घेत गुरांचा मोठा साठा केला जातो. त्यानंतर रात्री ८ व पहाटे ४ नंतर काही तास ही गुरे दळवटणे भागात आणून तेथून ट्रक, बोलेरो वाहनांनी त्यांची महाड कराडकडे वाहतूक केली जाते. जुने, अनेक गुन्हे दखल असलेल्या दलालच याचे मुख्य असून त्यांचा अनुभव व मार्गदर्शन यावर ही वाहतूक चालते. टेरव, कामथे आदी भागातूनही मोठ्या प्रमाणात गुरांची खरेदी होत असल्याची चर्चाही सुरू आहे.www.konkantoday.com