
मासेबारी बंदी काळात मच्छिमारांना निर्वाह भत्ता मिळावा
मासेमारी बंदी काळात राज्यातील सर्व मच्छिमारांना निर्वाह भत्ता मिळावा तसेच एलईडी, पर्ससीन मासेमाारीवर बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली.पावसाळी हंगामात जून ते जुलै असे दोन महिने सागरी मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. मच्छिमारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने व माशांचा प्रजनन काळ असल्याने त्यांच्या पैदासीवर परिणाम होवू नये म्हणून ही बंदी घातली जाते. यावेळी १ जूनपासून मासेमारीला प्रतिबंद घालण्यात आला आहे. मासेमारी मंदी काळात मच्छिमारांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. मासेमारी हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने मच्छीमारांपुढे आर्थिक संकट उभे असते.महाराष्ट्र वगळता काही राज्यांमध्ये मासेमारी बंदी काळात मच्छिमारांना निर्वाह भत्ता दिला जातो. महाराष्ट्रात मात्र तसे होत नाही. विशेष करून कोकण किनारपट्टीतील मच्छिमारांचा निर्वाह भत्ता देण्याबाबतची संघटनांची कित्येक वर्षांची मागणी आहे. www.konkantoday.com