
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लागणार, जिल्हाधिकारी -पोलीस अधीक्षकांकडून चंपक मैदानावरील निवाऱ्याची पाहणी
*रत्नागिरी दि. 26 :शहरातील मोकाट जनावरांना पकडून चंपक मैदानातील ठेवण्यात येणाऱ्या निवाऱ्याच्या कामकाजाची जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
मोकाट जनावरांना ठेवण्यात येणाऱ्या निवाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्या चाऱ्याची आणि पाण्याचीही सोय करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com