हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिवस्मरण यात्रेला उत्स्ूर्त प्रतिसाद.
ऐतिहासिक गडदुर्गांना भेटी देवून तेथील इतिहास जाणून घेण्याच्या उद्देशाने हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरच्या वतीने आयाेजित शिवस्मरण यात्रे दरम्यान राजापुरातील शिलेदारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळांना भेट देत, त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. या माेहिमेमध्ये गडावर स्वच्छता माेहीम देखील राबविण्यात आली.गडकाेट माेहिमेचा प्रारंभ राजापुरातील शिवतिर्थावरून गडकाेट माेहीम प्रमुख विवेक गुरव यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करून झाला.
यानंतर छाेटा शिलेदार निरंजन बावधनकर याने दमदार अशी गारद दिली. प्रतिष्ठान व्यापारी उमेश काेळवणकर यांच्या हस्ते गाड्यांना श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विवेक गादीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप गाेखले, हिंदू जनजागृतीचे विनाेद गादीकर, विश्व हिंदू परिषदेचे संदेश टिळेकर, शिवभक्त विनय गादिकर, संदीप देसाई उपस्थित हाेते.www.konkantoday.com