सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तळाशील खाडीत आढळला स्पर्म व्हेल.
व्हेल जातकुळीतील ड्वार्फ स्पर्म व्हेल ही अनोखी प्रजाती गुरुवारी मालवण येथील तळाशील खाडीत किनाऱ्याजवळ आढळून आली. या व्हेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रात सोडून दिले आहे.जिवंत ड्वार्फ स्पर्म व्हेलला मच्छीमारांनी रेस्क्यू केल्याची महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना मानली जात आहे.
तळाशील येथील काही मच्छीमारांना दुपारच्या सुमारास बोटिंग करत असताना खाडी किनारी उथळ पाण्यात ड्वार्फ स्पर्म व्हेल आढळून आला. तात्काळ या व्हेलला रेस्क्यू करून सुरक्षितपणे तळाशील जवळील खोल समुद्रात सोडून देण्यात आले. ही एक सिंधुदुर्गच्या सागरी जैव विविधतेमधील दुर्मिळ घटना मानली जात असल्याचे या विषयातील तज्ञांनी यांनी सांगितले आहे.