![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/01/download-4-18.jpeg)
शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीताने पळून गेले- ठाकरे गटाचे नेते संजय राऊत.
एकनाथ शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाही की शिवसेनाप्रमुखांचे वारसदारही नाहीत. शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीताने पळून गेले आहेत. शिंदेंच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का?पेपर तरी वाचतो का हा माणूस. काय म्हणतो. आमचं बघू ना आमची मनगटं, तुमच्यावर मनगटं चावण्याची वेळ येणार आहे. तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला चढवला. काल मुंबईत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुका एकट्यान लढवण्याचे संकेत दिल्यावर एनकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते, घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. शिंदेंच्या याच विधानाला प्रत्युत्तर देताना आज संजय राऊतांनी त्यांच्यावरच हल्लाबोल केला. तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही. मोदी आणि अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरे घालण्यासारखं आहेत. तुमची सत्ता आणि प्रतिष्ठा कायम राहणार नाही. तुम्ही तात्पुरते आहात. ज्यांनी ही पदे तुम्हाला दिली तेच तुमची पदे काढून घेतील आणि तुमच्यातीलच लोक तुमच्या उरावर बसवतील असा इशारा राऊत यांनी दिला.