
रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट
रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. सन 2023-24 मध्ये 1 हजार 388 गुन्हे घडले हाेते. त्यापैकी 1 हजार 121 गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 80 टक्के आहे. ते आणखी वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून विविध गुन्हेगारांच्या खात्यातील 41 लाखांची रक्कम गाेठवली असली तरी आराेपी परदेशातील असल्याने त्यांना पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. अशी माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
विशेषतः चाेरी, जबरी चाेरी, दंगा आदी गुन्हे घटल्याने हे प्रमाण घटले आहे. गुन्हे नियंत्रित रहावे यासाठी आम्ही जिल्ह्यात क्युआर काेडचे पेट्राेलिंग सुरू केले. गुन्ह्यांच्या घटना बदलत असल्याने पाेलिसांसमाेर उघड करण्यास काही अडचणी निर्माण हाेत आहेत. असे असले तरी पाेलिसांकडून तांत्रिक बाबींचा तपासकामात समावेश केल्याने गुन्हे उघडकीस येण्यास मदत हाेते.www.konkantoday.com