मिरकर वाडा भागातील अनधिकृत बांधकाम पाडण्यावर मत्स्य विभाग ठाम, सोमवारी कारवाई होणार.
मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यात बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याचे तसेच मिरकर वाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश खात्याला दिले होते. मात्र मिरकर वडा येथील मच्छीमारांनी बांधकामे काढण्यासाठी मुदत मागितली होती त्याप्रमाणे त्यांना दोन दिवस मुदत वाढवून देण्यात आली होती मात्र मत्स्य विभागाने आज पोलीस बंदोबस्तात नोटीसधारकांना बांधकामे काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.
सव्वीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत बांधकामे न पाडल्यास सोमवारी ही बांधकामे पाडण्यात येतील व होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार राहणार नाही, असे विभागाकडून आज रिक्षा फिरवून नोटीस धारकांना सांगण्यात आले आहे त्यामुळे सोमवारी या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभाग सज्ज झाला आहे.