
पाली पंचक्राेशीतील विविध कार्यकारी साेसायटीच्या प्रतिनिधींना दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमंत्रण.
प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे संगणकीकरण या उपक्रमांतर्गत सर्वाेत्तम कामगिरी केलेल्या तालुक्यातील पाली पंचक्राेशीतील विविध कार्यकारी साेसायटीच्या प्रतिनिधींना दिल्ली येथे हाेणाèया प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहण्याचे निमंत्रण प्राप्त झाले आहे.नाबार्ड संस्थेकडून शिारस करण्यात आलेल्या या साेसायटीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तसे पत्र मिळाले आहे. ही बाब पाली पंचक्राेशी विविध कार्यकारी साेसायटीसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
सन 1946 पासून कार्यरत असलेल्या पाली पंचक्राेशी विविध कार्यकारी साेसायटीची एकूण सभासद संख्या 933 एवढी आहे. पालीसह पाथरट, साठरे-बांबर, वळके, कापडगाव, चरवेली गावांना ही संस्था सेवा देत आहे.www.konkantoday.com