नोकरीची संधी : अभियंत्यांची भरती
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई – इंजिनीअरिंग डिप्लोमा, इंजिनीअरिंग पदवीधर आणि जनरल स्ट्रीम पदवीधर उमेदवारांची ॲप्रेंटिसशिप ॲक्ट (अमेंडमेंट) १९७३ अंतर्गत एकूण २०० ॲप्रेंटिसेस पदांची भरती.
(I) इंजिनीअरिंग डिप्लोमा अॅप्रेंटिसेस – ३० पदे
(अजा – ३, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस् – २, एसईबीसी – २, खुला – १२).(सिव्हील – ५, कॉम्प्युटर – ५, मेकॅनिकल – १०, इलेक्ट्रिकल – १०)
.पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
(II) इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसेस – १२० पदे
(अजा – १५, अज – ८, इमाव – ३६, ईडब्ल्यूएस् – ११, एसईबीसी – ११, खुला – ३९).(सिव्हील – १०, कॉम्प्युटर – ५, इलेक्ट्रिकल – २५, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन – १०, मेकॅनिकल – ६, शिपबिल्डींग टेक्नॉलॉजी किंवा इंजिनीअरिंग/ नेव्हल आर्किटेक्चर – १०).
पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.
(III) जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस – ५० पदे
(अजा – ६, अज – ३, इमाव – १५, ईडब्ल्यूएस् – ४, एसईबीसी – ४, खुला – १८) (बी.कॉम्./ बी.सी.ए. / बी.बी.ए./ बी.एस्.डब्ल्यू.).
पात्रता : संबंधित पदवी उत्तीर्ण.उमेदवारांनी डिप्लोमा/पदवी परीक्षा १ एप्रिल २०२० नंतर उत्तीर्ण केलेली असावी.MDL च्या वेबसाईटवरील जाहिरातीच्या Annexure- I मध्ये पात्रतेसाठी इंजिनिअरींग डिग्री आणि डिप्लोमाच्या संबंधित ब्रॅंचेसची यादी दिलेली आहे.
स्टायपेंड : दरमहा – १ वर्षाच्या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग दरम्यान डिप्लोमा ॲप्रेंटिसेसना दरमहा रु. ८,०००/-, ग्रॅज्युएट्सना रु. ९,०००/-.वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२५ रोजी १८ ते २७ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)
निवड पद्धती :* प्राप्त अर्जांमधून पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार कागदपत्र पडताळणी आणि इंटरव्ह्यूसाठी बोलाविले जातील. निवड यादी बनविताना पात्रता परीक्षेतील गुणांसाठी ८० टक्के वेटेज आणि इंटरव्ह्यूकरिता २० टक्के वेटेज दिले जाईल.
शंकासमाधानासाठी* mdlats@mazdock. com या ई-मेल आयडीवर किंवा टेलिफोन नंबर ०२२-२३७६४१५५ (वर सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० वाजेदरम्यान) संपर्क साधा.ऑनलाइन अर्ज MDL वेबसाईट https:// mazagondock. in या संकेतस्थळावर दि. ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावेत.
MDL ॲप्रेंटिस पोर्टलवर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. दि. ७ फेब्रुवारी २०२५.पात्रता/अपात्रता संबंधित तक्रारी दाखल करण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०२५.
इंटरव्ह्यूसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा दिनांक १४ फेब्रुवारी २०२५.इंटरव्ह्यू दि. १७ फेब्रुवारी २०२५ पासून घेतले जातील.