
थिबा राजवाडा संगीत महोत्सवात सहभागी होणार ‘रेखाटन अर्बन स्केचर्स ग्रुप कोल्हापूर
‘कोल्हापूर येथील अर्किटेक्ट्स, चित्रकार, हौशी स्केचर्स यांनी रेखाटन नावाचा समूह जानेवारी २०१६ मध्ये सुरू केला. उद्देश हाच होता, की इच्छा असली तरी एकेकट्याने जाऊन स्केचिंग करणे शक्य होत नाही म्हणून एकत्र येऊन चांगलं काम घडावं, नवीन स्केचर्सना स्फूर्ती मिळावी स्केचिंग करण्यात सातत्य राहवं, या हेतूने ही मंडळी दर रविवारी एकत्र येतात. या क्षेत्रातील हौशी कलाकारांसाठी तज्ञ मंडळींना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन, चर्चा, कार्यशाळा असे उपक्रम ‘रेखाटन’ च्या छताखाली होतात. आर्ट सर्कल आयोजित थिबा राजवाडा इथे होणार्या संगीत महोत्सवाचं औचित्य साधून ‘रेखाटन’चे सर्व कलाकार रत्नागिरीत येत आहेत. त्यांच्या वेळापत्रकानुसार, दि. २४ रोजी ते राजवाडा परिसरात स्केचिंग करतील. दि. २५ रोजी सकाळी कासारवेली गाव आणि संध्याकाळी बसारा बोट आणि दि. २६ जानेवारी रोजी सकाळी मिरकरवाडा जेट्टी आणि दुपारी श्री मलुष्टे यांच्या निवासस्थानी दोन दिवसातील स्केचेसची चर्चा आणि डिस्प्ले होणार आहे.

आर्किटेक्ट मिलिंद रणदिवेंसह, आर्किटेक्ट आशर फिलिप, निलेश वालावलकर, राहुल रेपे, रुपेश चौगुले हे मुख्य कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच पुण्यामधील कलाकार शैलेश मेश्राम आणि त्यांचे सहकारी सहभागी होत आहेत. चित्रकार शैलेश वॉटर कलरचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. रत्नागिरीमधील निवडक परिसर कलाकारांकडून कागदावर रेखाटला जाणार आहे. या उपक्रमामध्ये रत्नागिरीतील स्केचर्स देखील सहभागी होऊ शकतात. हा उपक्रम सहभागींसाठी विनामूल्य आहे. इच्छुक कलाकारांनी अनुजा कानिटकर (८९७५१८४४३४) किंवा आशर फिलिप (९९७५९९९९८७) यांच्याशी सम्पर्क साधावा.