एचडीएफसी बँकेचा नफा २.३ टक्के वाढीसह १७,६५७ कोटींवर!

मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बॅंकेला सरलेल्या डिसेंबर तिमाहीत १७,६५७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात २.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेचा पतविस्तार सरलेल्या तिमाहीत कमी झाल्याने एकूण नफ्यावर परिणाम झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने १६,३७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. मात्र मागील सप्टेंबर तिमाहीच्या १६,८२०.९७ कोटी रुपयांपेक्षा नफा किंचित कमी आहे.

बँकेचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ८१,७२० कोटी रुपयांवरून ८७,४६० कोटी रुपयांपर्यंत वधारले आहे. संकलित एकूण उत्पन्न मागील वर्षाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर तिमाहीच्या अखेरीस असलेल्या १,१५,०१६ कोटी रुपयांवरून १,१२,१९४ कोटी रुपयांवर घसरले आहे.मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत, बँकेचे एकूण अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) डिसेंबर २०२४ च्या अखेरीस एकूण कर्जाच्या १.४२ टक्क्यांपर्यंत वधारले आहे, जे गेल्या वर्षी १.२६ टक्के नोंदवले गेले होते. तर निव्वळ बुडीत कर्ज डिसेंबर २०२३ मधील ०.३१ टक्क्यांवरून ०.४६ टक्क्यांपर्यंत वधारले आहे.बुधवारच्या सत्रात एचडीएफसी बँकेचा समभाग १.४४ टक्क्यांनी म्हणजेच २३.६५ रुपयांनी वधारून १,६६६.०५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे १२.७४ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button