
दापोली तालुक्यातील टेटवली-मळेकरवाडी येथे घराला आग लागून साडेसहा लाखांची हानी.
दापोली तालुक्यातील टेटवली-मळेकरवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत छप्पर आणि आतील साहित्य भस्मसात झाले. मात्र आदल्या दिवशी सायंकाळी घरात साप शिरल्याने त्या भीतीने घरातील सहाजण अन्यत्र रहायला गेल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या आगीत घरातील सर्व साहित्य जळून गेले असून साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाले.दापोली तालुक्यातील टेटवली-मळेकरवाडी येथे देवू-भडवळकर यांचे घर आहे. भडवळकर यांनी नवीन घर बांधल्यामुळे ते तेथे रहायला गेले आहेत. मात्र जुन्या घराची साफसफाई व्हावी तसेच तेथे राबता राहण्यासाठी त्यांनी विजय नरवत व रूपेश जगदाळे यांना हे घर राहण्यास दिले. विजय नरवत यांची पत्नी व दोन मुले तसेच रूपेश जगदाळे व त्यांची पत्नी असे सहाजण या घरात रहात होते.www.konkantoday.com




