
अमित विलणकर, लायन्स क्लब हॉस्पिटलच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
रत्नागिरीअमित विलणकर व लायन्स क्लब आय हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमाने नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न झाले. १९ जानेवारी रोजी हे शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक १४ मध्ये रत्नागिरीत जिल्हा तेली सेवा संघ कार्यालय तेली आळी येथे कारण्यात आले होते.श्री संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री गणेश धुरी व भाजपा चिटणीस अमित विलणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यासाठी लायन्स क्लब चे डॉक्टर किशोर सूर्यवंशी , सौ. दीप्ती ओंकार फडके, विजय मोरये यांचे विशेष सहकार्य लाभले.या शिबिराला मुकुंद विलणकर , विशेष कार्यकारी अधिकारी संजय प्रभाकर साळवी, भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा सौ वर्षाताई ढेकणे , अस्मिता (दया )चवंडे, विलास विलणकर, मनोहर कोतवडेकर ,सचिन लांजेकर , प्रकाश (भाई) नाचणकर, दादा ढेकणे, कमलाकार जोशी,अशोक (बाबल) मयेकर,दिलीप नागवेकर, राजेंद्र रसाळ,सौ. प्रियांका नाचणकर, श्रीमती अनिता खानविलकर,विजया घुडे, स्मितल नागवेकर,मधुरा विलणकर, परेश कोतवडेकर,प्रमोद विलणकर मच्छिंद्र नागवेकर,शिवराम विलणकर, दत्ता कीर,पद्माकर पावसकर, अमित पावसकर (भाजपा शहर उपाध्यक्ष) सुरज बंटी जोशी भाजपा शहर चिटणीस बूथ प्रमुख समीर विलणकर (भाजपा चिटणीस शहर वि का अ ) , अमर विलणकर (भैरी मंदिर ट्रस्टी विश्वस्त),प्रकाश नाखरेकर,मनीष जोशी,चैतन्य घुडे,अनिकेत नागवेकर,सागर विलणकर, अक्षय नाखरेकर,आजमल् हुन्नेरक, तेजस नाखरेकर,भालचंद्र विलणकर इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी कमलाकर जोशी, चैतन्य घुडे, अनिकेत नागवेकर अजय नाचणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा तेली सेवा संघाने सभागृह उलब्ध करुन दिल्याबद्दल अमित विलणकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले.