संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयाजवळील अतिक्रमण हटवा अन्यथा उपोषणाचा इशारा.
संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयाजवळ अनधिकृत भराव टाकून केलेले अतिक्रमण त्वरित न हटविल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात जवळच्या भागात मोठ्या प्रमाणात डोंगराचे उत्खनन होत असून त्याच्या चौकशीची मागणी केली जात आहे. भराव टाकून अनधिकृत बांधकाम करणार्यांची चौकशी करून ते त्वरित हटविण्याची मागणी कसबा ग्रामस्थ निकेतन पांडुरंग चव्हाण यांनी देवरूख तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग चौपदरीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. चौपदरीकरण दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उत्खनन केले जात आहे. डोंगर पोखरून सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विनापरवाना सुरू असलेल्या डोंगर उत्खननाची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. अनधिकृत बांधकाम तत्काळ हटविण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.www.konkantoday.com