
विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने दुसरे हिंदी कवि संमेलन मोठया उत्साहात संपन्न.
रत्नागिरी, दि. 22 : गृह मंत्रालय द्वारा गठीत नगर राजभाषा कार्यान्वित समिती तर्फे हिंदी कवि संमेलनाचेआयोजन करण्यात आले होते.
सदर संमेलन लाइट हाउस व बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस द्वारा पुरस्कृत करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. गतवर्षी पासून या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार तथा कार्यान्वयनसाठी गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये एकूण 29 कार्यालयांचा समावेश असून अध्यक्षपद बँक ऑफ इंडिया कडे आहे.
कार्यालयीन कामकाजाबरोबरच सामाजिक दायित्वाचे कामकाज म्हणून स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, वृक्षारोपण, वृक्षरोप वितरण, स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून हर घर तिरंगा बाइक या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कवि संमेलनाला कवि म्हणून आपले नवोदित कवींना प्रोत्साहन देवून त्यांचा सहभाग वाढवला गेला. संमेलनामुळे कार्यालयातील प्रतिभावान स्टाफ सदस्यांना करिता एक कविमंच उपलब्ध करून दिला आहे.
संमेलनाचे निवेदन गोगटे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शाहू मधाले यांनी केले. कार्यक्रमास समिती अध्यक्ष नरेंद्र रघुनाथ देवरे, उप महाप्रबंधक, बैंक ऑफ इंडिया आंचलिक कार्यालय, उप महानिरीक्षक टी.एन. उपाध्याय, भारतीय तटरक्षक वायु अवस्थान, शैलेश बापट, क्षेत्रीय रेल प्रबंधक, कोंकण रेल्वे तसेच अंजनी कुमार सिंह आज़ाद, सहायक महाप्रबंधक बैंक ऑफ इंडिया आंचलिक कार्यालय तथा सर्व कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व अन्य स्टाफ सदस्य उपस्थित होते. कविसंमेलन यशस्वी होण्याकरिता सदस्य सचिव रमेश गायकवाड, वरिष्ठ प्रबंधक, बँक ऑफ इंडिया व लाइट हाउस चे प्रभारी ललित प्रकाश व टीम आणि बँक ऑफ इंडियाच्या टीमने अपार मेहनत घेतली आहे. कवि सम्मेलनाचे सूत्र संचालन बँक ऑफ इंडियाचे धीरज मोरे यांनी केले.