रिळ-उंडी एमआयडीसीसाठी २६४ कोटींच्या निधीची मागणी, शासकीय दराच्या चौपट दर मिळणार.
रत्नागिरी तालुक्यातल रिळ-उंडी एमआयडीसीसाठी भूसंपादनाकरिता आता उपविभागीय कार्यालयाकडून २६४ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या परिसरात प्रति आर २६ हजार ६८२ या शासकीय दराच्या चौपट दर देण्यात येणार आहे. निधीची उपलब्धता होताच भूसंपादनास सुरूवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.तालुक्यातील रिळ आणि उंडी गावामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी सरकारने अधिसूचना जाहीर केली आहे.
रिळ गावातील १३६ सातबारावरील १५३ हेक्टर जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित झाले आहे. तर उंडी गावात ४९ सातबारा भागांवरील ६० हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. एकूण २१३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मूल्याच्या चौपट मोबदला मिळणार आहे.www.konkantoday.com