मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाला गॅबिंगवॉल, लोखंडी जाळ्यांचे संरक्षण.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी कोकण रेल्वे प्रमाणे लोखंडी जाळीद्वारे उपाययोजना केल्या जात आहेत. त्याशिवाय कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारणयाचे कामदेखील सुरू केले आहे.

पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत लोखंडी जाळीचे काम केले जात आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रत्यक्षात सुरूवात होवून १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे. परशुराम घाटात गेल्या दोन ते तीन वर्षात भराव टाकून व एका बाजूला डोंगर कटाई करून रूंद केलेल्या मार्गावर पावसाळी हंगामापासून आजपर्यंत अनेक छोट्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत.आता तज्ञ टीमने केलेल्या सुचनेनुसार परशुराम घाटात उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोकण रेल्वेने दरडीच्या ठिकाणी ज्या पद्धतीने जाळ्या उभारून मार्ग सुरक्षित केला आहे.

अगदी त्याच धर्तीवर घाटातील ४० मीटर उंच व ९०० मीटरच्या अंतरात लोखंडी जाळी टाकून अतिशय धोकादायक असलेला दरडीचा भाग सुरक्षित केला जात आहे. त्यासाठी घाटात विविध ठिकाणी ड्रिलद्वारे लोखंडी रॉड टाकून त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. या कामाची जबाबदारी उत्तराखंडमधील शासकीय कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button