मीडियाने दाखवायचं बंद केलं तर पाच दिवसात लोकं संजय राऊत कोण हे विसरतील आमदार निलेश राणे.
माध्यमांनी दाखवायचं बंद केलं तर पाच दिवसात लोकं संजय राऊत कोण हे विसरतील असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी लगावला आहे.संजय राऊत कधी जनतेतून निवडून आलेत का ? बरोबर एक तरी आमदार आहे का? जो एका महिलेला शिवीगाळ करतो, पत्रकाराच्या माईकवर थुंकतो, नेत्यांबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो.
मीडियाने दाखवायचं बंद केलं तर पाच दिवसात लोकं संजय राऊत कोण हे विसरतील. संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते रोज अशी फालतू विधानं करत असतात. संजय राऊतला मीडियामध्ये का जिवंत ठेवलं आहे? तो माणसाचे महाराष्ट्रासाठी योगदान काय? संजय राऊत यांना दुसरा काही काम धंदा नाही.