दापोली मंडणगड बसमध्ये शिरत असताना प्रवासी महिलेचे ३० हजार चोरट्याने लांबविले.

दापोली मंडणगड बसमध्ये शिरत असताना एका अज्ञात महिलेने प्रवासाला जाणार्‍या महिलेच्या पर्समधील सुमारे  ३० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणामुळे दापोली बसस्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रेखा जाधव, रा. पन्हाळेकाजी या कामानिमित्ति दापोलीमध्ये आल्या होत्या.बाजारात खरेदी केल्यानंतर त्या दापोली बसस्थानकातून दापोली-मंडणगड बसमध्ये आपले माहेर वणौशी येथे जाण्यासाठी दापोली-मंडणगड या बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधून मागे असलेल्या अज्ञात इसमाने ३० हजार रुपये चोरून तेथून पोबारा केला.

ही गोष्ट लक्षात येताच रेखा जाधव यांनी लगेच वाहकाला त्याची कल्पना दिली. प्रवाशांनी गच्च भरलेली ही बस दापोली पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तेथे सर्व प्रवाशांची पोलिसांनी चौकशी केली असता कोणाकडेही रोख रक्कम आढळून आली नाही. दरम्यान दापोली ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सध्या दापोली पोलीस दापोली बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button