थिबा पॅलेस जवळील वृक्षतोड प्रकरणात नगर परिषदेने ठोठावला ६८ हजार रुपयांचा दंड.
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेसजवळील जागेत असलेले पार्किंग आरक्षण नगर रचना उपसंचालक कार्यालयाने रद्द केले. या आरक्षित क्षेत्रातील झाडांची कत्तल प्रकरणी नगर परिषदेने बिल्डरला ६८ हजार रुपयांचा दंड भरण्याचे फर्मान काढले आहे. या प्रकरणी दंड भरण्याची नोटीस नगर परिषदेने संबंधित बिल्डरला बजावल्याची माहिती समोर येत आहे.
थिबा पॅलेसजवळील पार्किंग आरक्षित जागा विकासकाने घेतली. या जागेवरचे पार्किंग आरक्षण नगररचना उपसंचालक कार्यालयाने उठवले. राजपत्रातील नोंदीनुसार हे पार्किंग आरक्षण रद्द झाल्यानंतर लगतचा हरित पट्टा आरक्षणात वर्ग होईल अशी टिप आहे. त्यामुळे हरित पट्ट्यातील ३४ झाडे तोडणे बेकायदेशीर ठरत असल्याने मतसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.www.konkantoday.com