सापुचेतळे वाघ्रट मार्गावर दोन दुचाकी एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी
दोन दुचाकी एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या दरम्याने सापुचेतळे वाघ्रट मार्गावर तरळवाडी स्टॉपनजीक घडला.गोपीनाथ महादेव मांडवकर (वय ४८, राहणार वाडीलिंबू पाष्टेवाडी) हे दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या दरम्याने आपल्या एक्सेस दुचाकीने क्रमांक (एम एच ०१ बीएच ५८८०) घेऊन सापुचेतळे येथून वाडीलिंबूकडे चालले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे सुभद्रा रघुनाथ पाष्टे (रा. वाघ्रट)ही महिला बसली होती.
गोपीनाथ मांडवकर तरळवाडी स्टॉपनजीक आहे असताना अपघात ठिकाणच्या रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता दुचाकी हयगईने व अविचाराने आणि भरधाव वेगाने चालवून उजव्या बाजूला रॉंग साईडला जाऊन वाघ्रटकडून येणाऱ्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक एम एच ०७ बीएच ०९४४) हिला जोरदार ठोकर दिली. या अपघातामध्ये हिरो स्प्लेंडर मोटरसायकलस्वार संतोष गंगाराम पत्त्याने (वय ४० वर्षे राहणार वाघ्रट पत्त्यानेवाडी )आणि ॲक्सेस गाडीवर बसलेल्या सुभद्रा रघुनाथ पाष्टे हे दोघेजण जखमी झाले. तर या अपघातात गोपीनाथ महादेव मांडवकर यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अपघातात मृत गोपीनाथ मांडवकर यांच्यावर हयगयीने दुचाकी चालवून स्वतःच्या मृत्यूस तसेच दोघांच्या लहानमोठ्या दुखापतीस आणि दोन्ही दुचाकींच्या नुकसानीस कारणीभूत ठरवून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६, २८१, १२५(अ), १२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम