न्यायालयाने याचिका फेटाळल्याने रत्नागिरीत नवीन भाजीमार्केट इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा.
रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची नवीन भाजीमार्केटची इमारत नव्याने बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेकायदेशीर प्रक्रियेने रत्नागिरी नगर परिषदेने गाळे ताब्यात घेवू नयेत, यासाठी जुन्या इमारतीतील गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. गाळेधारकांनी ही याचिका न्यायालयाने फेटाळली.रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन भाजीमार्केटमधील ४५ वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. ही इमारत वापरण्यात धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने गाळेधारकांना त्यांचे गाळे नगर परिषदेच्या ताब्यात देण्याची नोटीस बजावली. या नोटीसला १९ गाळेधारकांनी न्यायालयात आव्हान देवून कायदेशीर कार्यवाही झाल्याशिवाय आमचे गाळे रत्नागिरी नगर परिषदेने ताब्यात देवू नयेत, अशी विनंती गाळेधारकांनी न्यायालयाला केली होती.नवीन भाजीमार्केटची इमारत फारच जुनी झाल्याने इमारतीतील स्लॅबचे, भिंतीचे तुकडे पडत होते. त्यामुळे तीन ते चारवेळा नोटीस देवून गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची सूचना करण्यात आली.
पावसाळ्यात तर नगर परिषदेने या इमारतीच्या धोक्यासंदर्भात मोठा फलकही लावला होता. न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने रत्नागिरी येथील परिषदेने ही इमारत पाडण्याचाही प्रयत्न केला परंतु हा वाद न्यायालयात असल्याने गाळेधारकांनी विनंती केल्याने नगर परिषदेचे पथक माघारी फिरले होते. आता मात्र दिवाणी न्यायालयाने गाळेधारकांची याचिकाच फेटाळून लावल्याचे आता नवीन भाजीमार्केटची नवीन इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.www.konkantoday.com