
दावोस मध्ये पार पडला महाराष्ट्र सरकारचा पहिला सामंजस्य करार !
दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि कल्याणी समूहासोबत स्टील आणि संरक्षण क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांची भेट झाली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली. एकूण ५,२५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून गडचिरोली येथे ४,००० रोजगार निर्माण होणार आहेत, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.