तळवडे गावात मधुमक्षिका पालनाचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यात मधुपर्यटन, मधुमक्षिका पालन या थेट रोजगार मिळवून देणाऱ्या योजना राबवल्या जाणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कोकणातील तळवडे गावासाठी पितांबरी प्रॉडक्ट्सचे रवींद्र प्रभुदेसाई यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
या गावात मधुमक्षिका पालनाचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणात महत्त्वाची भूमिका असलेल्या मधमाशांचेही संवर्धन होणार आहे.तळवडे हे मधाचे गाव म्हणून मंजूर झाल्यास पर्यटन विकासासह ग्रामस्थांना रोजगार मिळणार आहे.