
टेरव-अडरेच्या सीमेवर कोळसा भट्टी उध्वस्त, एकावर गुन्हा दाखल.
गेल्या काही महिन्यात टेरव येथे कोळसा भट्ट्यांवर कारवाई होत असतानाही कोळसा भट्ट्या धगधगत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी टेरव-अडरे गावच्या सीमेवर कोळसा भट्ट आढळली. ही भट्टी उध्वस्त करून कोळसा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेरव येथे गेल्या काही महिन्यात कोळसा भट्ट्यांवर येथील वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाया पाहता कोळसा भट्ट्या धगधगणार नाहीत, अशी अटकळ होती. मात्र वनविभागाच्या पथकाने टेरव-अडरे गावच्या सीमेवर अवैध कोळसा भट्टींवर कारवाई करून ही भट्टी उध्वस्त केली आहे. तर या ठिकाणी तयार झालेला कोळसा जप्त करण्यात आला आहे.www.konkantoday.com