चिपळुणातील गटार कामामुळे चांगले रस्ते होताहेत खराब
गेल्या महिनाभरापासून बाजारपेठेतील तीन गटारांची तीन ठेकेदारांकडून संथगतीने कामे सुरू आहेत. ती करताना मोठ्या यंत्रांचाही वापर केला जात असल्याने मुख्य चांगल्या रस्त्यांची वाट लागली आहे. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सध्या वाळू मिळत नसल्याने काही प्रमाणात जुनी मातीमिश्रित वाळू आणून कामे केली जात असल्याने दर्जाबाबतही शंका उपस्थित होत आहे. याच्या तक्रारी होवूनही नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या महिन्यापासून वाहतून व्यवस्था वळवून नागरिकांचे नुकसान करीत बाजारपेठेसह बायपास मार्गावरील तीन गटारांची कामे केली जात आहेत. यासाठी करोडो रुपये खर्च होणार आहे. विशेष म्हणजे एका बाजूचे एकाला तर दुसर्या बाजूचे दुसर्याला अशा पद्धतीने खिरापत वाटण्यात आली आहे.
त्यामुळे तीन ठेकेदार आपापल्यापरीने आपल्या मनाला वाटेल अशा पद्धतीने कामे करीत आहेत. ही कामे संथगतीने होत असल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या कामांसाठी वाहतूक अन्य मार्गानी वळविण्यात आली आहे. याचे भानही ठेवले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.www.konkantoday.com